¡Sorpréndeme!

मुलुंडमध्ये दुकानदाराची अरेरावी, पोलिसांशी हुज्जत

2021-04-15 3,775 Dailymotion

मुलुंड येथील आर आर टी रोड वर नो पार्किंग मध्ये गाडी उभी करणाऱ्या दुकानदाराने वाहतूक पोलिसांना अर्वाच्य शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. जतीन सतरा असे या शिवीगाळ करणाऱ्या दुकानदाराचे नाव आहे. ज्ञानेश्वर वाघ आणि गोरख सानप हे वाहतूक पोलीस नो पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या गाड्यांवर कारवाई करीत होते. या वेळी जतीनच्या दुकानासमोर उभी त्याची बाईक उभी होती. पोलिसांनी कारवाई केल्यामुळे संतापलेल्या जतीनने वाहतूक पोलिसांनाच अर्वाच्य शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी जतीनला ताब्यात घेतले आहे.