¡Sorpréndeme!

डोंबिवलीत सायबर हल्ला: नागरिकांच्या खात्यातून पैसे गायब

2021-04-15 1,218 Dailymotion

डोंबिवलीच्या फडके रोड येथील आय.डी.बी.आय बँकेतून गुडीपाडवाच्या दिवशी अनेकांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे गेल्याची घटना घडली आहे.आधीच कोरोनाचे संकट त्यातच नववर्षाच्या पहिल्या दिवशी आय.डी.बी.आय बँकेत सायबर हल्ला झाल्यामुळे बँक खातेदारांना जबर फटका पडला आहे. खातेदाराच्या सेविंग आकाऊंट ,पेन्शन आकाऊंट मधून मोठमोठाली रक्कम गेल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत.आता नागरिकांनी जवळील पोलीस स्थानकात धाव घेऊन याची तक्रार दाखल सुद्धा केली आहे.यासंदर्भात बँक प्रबंधकाना विचारलं असता वरिष्ठांकडे तक्रार दिली आहे, सायबर हल्ला कसा झाला याची चौकशी सुद्धा आम्ही करतो असे त्यांनी सांगितले.मात्र कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला.

#cybercrime #IDBIBank #Dombivli #Covid19 #lockdown