¡Sorpréndeme!

जिना कोसळला, घरात अडकलेल्या आजींची नाट्यमय सुटका

2021-03-20 917 Dailymotion

पुणे : शिवाजी रस्त्यावर बुधवार पेठ परिसरातील एका मोडकळीस आलेल्या घरात अडकलेल्या आजींचा जीव वाचविला आहे.
घराचा जीना तुटल्याने त्या आजी घरातच अडकल्या होत्या. घराबाहेर येण्यासाठी उडी मारण्याची शक्यता असल्याने त्यांना पोलिसांनी आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी खाली बिल्डिंगच्या बाहेर काढले आहे. दरम्यान, घडनेची माहिती मिळताच फराज खाना पोलीस आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहचले. आजींना खाली उतरविण्यासाठी पोलिसांना आणि अग्निशामक दलाच्या जवानांना बरीच मेहनत घ्यावी लागवली, कारण आजी घरातून बाहेर येण्यास तयार होत नव्हत्या. पोलिसांनी आजींना थोड चहा-नाश्ता देऊन आजींचे मन वळविण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. अखेर आजींच्या कंबरेला दोरखंड बांधून जीना लावून बिल्डिंगमधून खाली उतवले. दरम्यान, आजींच्या मानसिक संतलून बिघडले असल्याची शक्यता असून पोलिसांनी त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवले आहे.