¡Sorpréndeme!

रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी रस्त्यावरच भरतेय ‘दादाची शाळा’

2021-03-12 865 Dailymotion

पुणे - कोरोनामुळे विद्यार्थी सध्या शाळेत जाण्याऐवजी घरातूनच ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. मात्र दुसरीकडे मुक्तपणे रस्त्याच्या एका कोपऱ्याला विद्यार्थ्यांची शाळा भरत आहे. मित्रांसमवेत ‘दादाच्या शाळेत’ शिकण्याचा आनंद विद्यार्थी घेत आहेत. रस्त्यावर राहून सिग्नलवर वस्तू विकून दोन वेळचे जेवण मिळविणाऱ्या या मुलांनाही शिक्षण मिळावे, यासाठी २१ वर्षीय तरुणाने पुढाकार घेतला आहे.
दररोज रस्त्यावर फिरून काही पैसे कमविणाऱ्या या मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, त्यांना देखील इतर मुलांप्रमाणे शिक्षण मिळावे, यासाठी अभिजित पोखर्णीकर याने या उपक्रमाची सुरुवात केली आहे. अभिजित व त्याचे सहकारी पथारिक मुलांसाठी काम करताहेत. त्यांना विनामूल्य शिक्षण देत आहेत.