¡Sorpréndeme!

उन्हात दगडाला टाकीचे घाव देऊन आकार देणारे व त्यातून उदरनिर्वाह करणारे लोक.

2021-03-09 178 Dailymotion

टाकळी हाजी, ता. 26 ः वर्षोनुवर्षे प्रपंचाचा गाडा हाकण्यासाठी गावा बाहेर मुक्काम करायचा, तीन दगडाच्या चुल मांडून प्रपंच थाटायचा. उन्हात दगडाला टाकीचे घाव देऊन आकार द्यायचा. त्यातून तयार होणाऱ्या दगडी वस्तू जाते, पाटा, वरवंटा, खलबत्ता डोक्यावर नेऊन वाडीवस्तीवर विकायच्या. त्यातून मिळणाऱ्या पैशातून कसा बसा प्रंपच चालवणारा समाज आजही आर्थीकदृ्ष्या मागास असलेला पहावयास मिळतो.
युनूस तांबोळी, सकाळ वृत्तसेवा