सायकल किंवा बाईकला दोन्ही बाजूला कॅन लावून दूध विकायला जाणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना आपण पाहतो. काही लोक दूध विकण्यासाठीच वाहन खरेदी करतात. भिवंडी येथील शेतकरी उद्योजक जनार्दन भोईर मात्र यात भलतेच वेगळे ठरले आहेत. या पठ्ठ्याने चक्क दूध विकण्यासाठी हेलिकॉप्टर विकत घेतले आहे.