¡Sorpréndeme!

‘दहावीचं वर्ष महत्वाचं, चांगला अभ्यास कर’, अजित पवारांचा विद्यार्थिनीला सल्ला

2021-01-26 50 Dailymotion

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत आज पुण्यातील येरवडा कारागृहामधील ऐतिहासिक वास्तु या जेल पर्यटन म्हणून राज्य सरकारने घोषित केल्या आहेत. त्याचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या निमित्ताने येरवडा भागातील गेनबा सोपनराव मोझे संस्थेतील दहा विद्यार्थ्यांची पाहणी करण्यासाठी निवड करण्यात आली होती. सहभागी झालेल्या एका विद्यार्थिनीशी अजित पवार यांनी संवाद साधला.