पिंपरी-चिंचवड शहरातील महानगर पालिकेच्या रुग्णालयात कोविड लसीकरणाला सुरुवात झाली. त्यापूर्वी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर, आरोग्य अधिकारी पवन साळवी यांनी प्रथम लस घेतली, अर्धा तास निरीक्षण कक्षात राहिल्यानंतर त्यांच्यावर कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत. ती लस सर्वांनी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
#PimpriChinchwad #covvaccine