¡Sorpréndeme!

३१ डिसेंबरला रजनीकांत करणार राजकीय पक्षाची घोषणा

2020-12-03 553 Dailymotion

तामिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी आपला राजकीय पक्ष सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. गुरूवारी रजनीकांत यांनी ट्वीट करत ३१ डिसेंबर रोजी आपल्या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती दिली. तसंच त्यांचा राजकीय पक्ष जानेवारी महिन्यापासून कार्यरत होईल असंही यावेळी सांगण्यात आलं.