सध्या भाजप-शिवसेनेत सत्ता वाटपावरुन कलगीतुरा सुरुच आहे दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी सुरू केली आहे आज ते नाशिक दौऱ्यावर आहेत आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेटी घेत आहेत नाशिकमध्ये आज जोरदार पाऊस पडत आहे अशास्थितीतही पवारांनी आपला दौरा सुरुच ठेवला आहे शरद पवार यांनी घोटी गावालाही भेट देत नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली यावेळी कोट्यवधीचे नुकसान झालेल्या नाशिक मधील द्राक्ष उत्पादकांनी शरद पवारां समोर आपली व्यथा मांडली