पुणे - येथील सिंहगड रोड परिसरात एका खासगी कोचिंग क्लासेसच्या संचालकाला पालकांनी चोप दिला अभिरुची मॉल पोलिस स्टेशन समोर असलेल्या शिक्षा अकॅडमीमध्ये ही घटना घडली पालकांनी आरोप केला की हा संचालक खासगी शिकवणीत समजावून सांगण्याच्या बहाण्याने मुलींना कथितरित्या मांडीवर बसवायचा आणि त्यांचे लैंगिक शोषण करायचा त्यापैकीच काही मुलींनी आपल्या पालकांना तक्रार केली आणि पालकांनी थेट संचालकाच्या कार्यालयात धडकून त्याची धुलाई केली