नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी मनोरंजन क्षेत्रातील नामवंत कलाकारांना आमंत्रित केले निमित्त होते, महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीचे बॉलिवूड कलाकारांना महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्यावर चित्रपट निर्मितीसाठी प्रेरित करणे हा यामागचा हेतू होता सिनेसृष्टीला गांधींच्या विचारांवर आणि त्यांच्या आयुष्यावर चित्रपट तयार करायला हवे असे मोदींनी बोलूनही दाखवले